लोरे – डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषिविद्यापीठ दापोली अंतर्गत कै राजाराम मराठे कृषिमहाविद्यालय फोंडाघाट येथील चतुर्थ वर्षातील कृषिदूतांचे लोरे नं १ येथे ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगीक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषिदयुतांनी कृषिमेळावा आयोजित केला होता .https://sindhudurgsamachar.in/kokan-कोकण-रेल्वेच्या-प्रश्ना/
कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती पूजन करण्यात आले .यासाठी प्रमुख अतिथी नरेश गुरव,लोरे नं १ गावचे सरपंच श्री. अजय रावराणे, कृषी सहाय्य्क सौ. अक्षया परब,तलाठी पदी कार्यरत असलेल्या सौ.माईनकर मॅडम ,ग्रामसेवक राकेश गोवळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. आधुनिक शेती व तंत्रज्ञान विषयी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक माहिती मिळावी यासाठी या मेळाव्यात विद्यार्थांनी विविध मॉडेल्स जसे हायड्रोपोनिक्स,वर्मिकंपोस्ट तयार करून आणले.आधुनिक शेतीसाठी लागणारी संसाधने ,उपकरणे,तसेंच पिकांवर पडणारे रोग व कीड यांची छायाछित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली. या कृषिप्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या रानभाज्यांचीही ओळख करून देण्यात आली .
या कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी नरेश गुरव तसेच कृषीसहाय्यक अक्षया परब यांनी आंबा आणी काजू यातील विविध प्रक्रिया ,शेतकऱ्यांना समजावून सांगितल्या. कार्यक्रम समन्वयक श्री. एस.एस.मोटे सर व मृदशास्त्र विभागच्या प्राध्यापिका मा. पाटणकर मॅडम यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.सभागृहात मांडलेले कृषिप्रदर्शन शेतकऱ्यांनी पाहिले ,यावेळी कृषिदूत व महाविद्यालयाच्या शिक्षकांनी शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.कृषिमेळाव्यास ग्रामस्थ व शेतकऱ्यांचा उत्कृष्ठ प्रतिसाद मिळाला.हा कृषिमेळावा संपन्न होण्यासाठी लोरे नं १ येथील कृषिदुत अविनाश तोडकर, ओंकार शिरतोडे ,विशाल गौराजे, रितेश पाटील ,श्रीराम कदम, प्रसंजित कामत ,भरतकुमार पोला यांनी विशेष मेहनत घेतली.